चक्क १८ लाखांची सिगारेट चोरीला

चाळीसगाव: शहरातील नॅशनल टोबॅको या दुकानाचे शटरचा कुलूप तोडून अज्ञात इसमाने १८ लाखांचा सिगारेटची चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात एकच
खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती, शहरातील पवन कॉम्प्लेक्स येथे सुरेश साबलदार रावलानी याचे मालकीचे नॅशनल टोबॅको हि दुकान आहे. त्यांच्याकडे आयटीसी लिमिटेड या कंपनीचे डिलरशिप आहे.
रावलानी हे शुक्रवार रात्री ८ वाजता दुकान बंद करून गेले. तर शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन असल्याने ते दोन दिवस दुकानाकडे आलेच नाहीत. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे
दुकानाकडे आले असता त्यांना शटरचा लॉक करण्यासाठीच्या पट्या तुटलेल्या दिसल्या. समोरील सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे दिसून आले. रावलानी लगेच पोलिस स्टेशन गाठत हि माहिती
पोलिसांना कळविली. यानंतर त्यांनी दुकानाची पाहणी केली असता चोरट्यांनी विविध प्रकारच्या सिगारेटची पाकिटे व अन्य साहित्य असे एकूण १८ लाख ३९ हजार ३१७ रूपयांचे मुद्देमाल चोरून
नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी याच दुकानातून अज्ञात इसमाने एकूण १२ लाखांचा सिगारेट चोरून
नेल्याची घटना घडली होती. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.