सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख एस.पी.जोशी यांना विद्यालयाने दिला निरोप

शहादा – वसंतराव नाईक कनिष्ठ विद्यालयातील मराठी विभागप्रमुख एस.पी.जोशी ह्या सेवानिवृत्त झाल्यामुळे शालेय परिवारातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. एस.पी.जोशी ह्या नियत वयोमानानुसार दि ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्या. शांत, संयमी व प्रेमळ स्वभावाच्या जोशीं बाईंना छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. प्राचार्य सुनील सोमवंशी, उपप्राचार्य आर जे रघुवंशी व उपमुख्याध्यापक एन बी कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मोजक्याच शिक्षकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून हा समारंभ पार पडला. सुत्रसंचलन के आर भावसार यांनी केले.