नवापूरकरांनी दिला जनता कर्फेुला चांगला प्रतिसाद

नवापूर- शहरा सह जिल्ह्यात कोविड-१९ चे रुग्ण दिवसेन दिवस वाढत असल्याने  जिल्हाधिकारी डाँ राजेंद्र भारुड यांनी संपुर्ण नंदुरबार जिल्हात शनिवारी व रविवारी जनता कर्फु(संचारबंदी)लागु केली आली.या निमिताने शनिवारी नवापूरकरांनी  जनता कर्फेुला शंभर टक्के प्रतिसाद दिला.नवापूर शहरात सकाळ पासुन तहसिलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,मुख्याधिकारी महेश चौधरी शहरात फेरफटका मारतांना दिसुन येत होते.शहराच्या मुख्य रस्त्यावर नवापूर नगरपालिकेने बेरेकेटींग केली असुन चौका चौकात पोलिस तैनात करण्यात आले आहे.शहरात चार चाकी,टुव्हिलर गाड्यांचा चालकांची विचारपुस करुन शहरात एंट्री देत असतांनाचे चिञ दिसत होते.तसेच नवापूर शहरातील जनता पार्क, गुजरगल्ली,सरदार चौक भागात नागरीकांची कोविड  टेस्ट टोल टाकुन करत असुन यामध्ये नागरीकांच्या चांगला प्रतिसाद मिळतांना दिसुन येत आहे.जनता पार्क,गुजरगल्ली भागात नगरसेविका अरुणा पाटील तसेच नगरसेविका बबीता वसावे यांनी त्यांचा प्रभाग २ मध्ये  फिरुन नागरीकांना कोविड-१९ टेस्ट करण्याची विनंती केली.त्याला नागरीक प्रतिसाद देत आहे.यावेळी तहलीलदार मंदार कुलकर्णी, नवापूर नगरपालिकेचे  मुख्यधिकारी महेश चौधरी,आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते सुंभाष कुंभार आदी उपस्थित होते.