जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट

0

जळगाव – जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रूग्णसंख्येचा स्फोट झाला असुन नव्याने २१६ रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक ७९ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जळगाव शहरातील ४७ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू देखिल झाला आहे. आत्तापर्यंत एकुण ५८५३५ रूग्ण आढळुन आले असुन त्यापैकी ५६ हजार ९८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण २, भुसावळ २४, अमळनेर १६, चोपडा १७, पाचोरा २, धरणगाव ३, यावल २, एरंडोल ३, रावेर २, पारोळा ३, चाळीसगाव ५४, मुक्ताईनगर ४, बोदवड १, इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण २१६ रूग्ण आढळुन आले आहे.

Copy