Private Advt

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापाल तर खबरदार !

0

आ.किशोर पाटील यांचा वीज वितरण अधिकाऱ्यांना सज्जड दम
पाचोरा : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचे कृषीपंपांचे वीज बिल भरण्यासाठी अभिनव योजना राबवली असून त्यानुसार राज्यभरातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र या वीज वितरण कंपनीचे अधिकारी मात्र या परिपत्रकाचा अभ्यास न करता सरसकट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करत आहेत.शेतकरी बांधवांना अडचणीत आणण्याचे काम करत असतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्व सूचना वा आकारलेले बिल न शेतकऱ्यांना न देता केवळ यादीच्या आधारे वसुली साठी तगादा लावत असल्याने शासनाने घेतलेल्या चांगल्या निर्णयाचा शेतकरी बाधवांना लाभ न मिळता वीज वितरण कंपनीच्या मनमानी मुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रथम बिलाची आकारणी करावी व सदर थकबाकी भरण्याची मुदत मार्च 2022 पर्यंत असल्याने त्याआधी शेतकरी बांधवांना नाहक त्रास देत कृषी पंपांचे वीज कनेक्शन तोडल्यास अधिकाऱ्याचा शिवसेना स्टाईल समाचार घेतला जाईल असा सज्जड दम पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांनी दिला आहे.शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना आमदार पाटील म्हणाले की, शासनाने शेतकऱ्यांकडे कृषी पंपांचा बिलांच्या वसुली साठी घेतलेल्या निर्णयानुसार सुमारे पन्नास टक्के माफी दिली असून सर्व व्याज माफ केले आहे तर उर्वरित बाकी बिलांच्या वसुलीतून तेहतीस टक्के वाटा स्थानिक ग्रामपंचायतींना ,तेहतीस टक्के वाटा जिल्हा नियोजनाला उर्वरित चौतीस टक्के वीज वितरण कंपनी ला मिळणार आहे या वसुली साठी मार्च २०२२ पर्यंत आहे.मात्र अधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांना आकारलेल्या बिले सादर केलेली नसून केवळ त्यांच्या कडील यादीच्या आधारे वसुली सुरू आहे त्यातच एखाद्या कृषी पंपा वर जोडणी असलेल्या एकाही शेतकऱयांची बाकी असल्यास संपूर्ण जोडणी बंद केली जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने नाहक त्रास न देण्याची सूचना त्यांनी केली आहे.
पत्रकार पारिषदेला म्हाडा नासिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, शेतकरी सेनेचे अध्यक्ष अरुण पाटील, सेनेचे तालुकाध्यक्ष शरद पाटील,प स चे माजी सभापती प्रल्हाद पाटील ,स्वीय सहाय्यक राजेश पाटील, पप्पू राजपूत, प्रवीण ब्राह्मणे, एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर वाघ यांची उपस्थिती होती.