खडसेंशी राजकीय मतभेद, वैयक्तिक नाही : माजी आमदार संतोष चौधरी

0

भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, माझ्यात व खडसे यांच्यात राजकीय मतभेद होते, वैयक्तिक नाही. खडसे आता राष्ट्रवादीत आल्याने त्यांचे मनापासून मी स्वागत करतो. त्यांच्या येण्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असून भाजपातील विरोधक संपणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीत भुसावळ पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा आशावादही त्यांनी वर्तवला. पार्टीकडून मुंबईत उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने आपण गेलो व एकाच व्यासपीठावरही आल्याचे ते म्हणाले.

Copy