पुलवामात दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; एक जवान जखमी

0

पुलवामा: जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुरक्षा रक्षकांनी नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. कालच लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये हल्ला केला होता. काल सुरक्षा रक्षकांनी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना पुलवामात अटक केली.