पिंपळनेरच्या सहाय्यक अभियंत्यांना ‘लाचखोरीचा शॉक’

0

धुळे : घरगुती वापरासाठी नवीन वीज मीटर मिळवून देण्यासाठी चार हजारांची लाचेची मागणी करणार्‍या पिंपळनेर शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता संजय कौतीक माळी (51) यांना धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवारी लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याने वीज कंपनीच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चार हजारांची लाच भोवली
पिंपळनेर येथील 43 वर्षीय तक्रारदाराला नवीन वीज मीटर हवे असल्याने त्यापोटी आरोपी संजय माळी यांनी 3 सप्टेंबर रोजी लाच मागितल्याने चार हजार रुपयात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, संदीप सरग, सुधीर सोनवणे, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, भुषण शेटे आदींनी केली.