कुटुंबीय वरच्या घरात झोपलेले अन् खालच्या घरात चोरट्यांची हातसफाई

0

बळीराम पेठेत घरफोडी; दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव : कुटुंबीय वरच्या घरात झोपलेल्या असतांना चोरट्यांनी खालच्या घराचा दरवाजा टॉमीने तोडून दागिन्यांसह रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री बळीरामपेठेत घडली.

याबाबत माहिती अशी की, योगेश काशीनाथ पवार (वय-४४) रा. बळीराम पेठ यांचे तीन मजली इमारत आहे. रात्री जेवण करून कुटुंबिय तिसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. त्यावेळी खालच्या घराचा दरवाजा बंद केला होता. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खालच्या घराचा दरवाज टॉमीने तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट फोडले. कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या, ५ ग्रॅम सोन्याचा तुकडा, दोन चांदीच्या मुर्त्या आणि ७ ते ८ हजार रूपयांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Copy