आंदोलनाने गाजला रविवार

0

जळगाव– अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीअंतर्गत लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन तसेच किसान मुक्तीचा नारा देवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कर्नाटक राज्यातील मनगुत्ती गावांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तापित पुतळ्याला परवानगी असतानादेखील रात्रीच्या काळोखात गावकर्‍यांना बंदिस्त करू न बळाचा वापर करून ग्रामपंचायतीमधील भाजप सत्ताधार्‍यांच्या मदतीने काल कर्नाटकच्या भाजप सरकारने पुतळा हटविण्याचे निंदनीय कृत्य के ल्याने जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने निदर्शने करुन निषेध करण्यात आला. तसेच शिवसेनेच्यावतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला. त्यामुळे रविवार आंदोलनाने गाजला.

लोक संघर्ष मोर्चाचे उलगुलान आंदोलन

शेतकर्‍यांची त्वरित कर्जमुक्ती करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकर्‍याचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल 2020 मागे घ्या, डीझेलच्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्णरेशन द्या, दुधाला हमीभाव वाढवून द्या, आदिवासींना त्यांनी दाखल केलेले दावे त्वरित निकाली काढून त्यांच्या शेतीचा अधिकार द्या.आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीअंतर्गत लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच उद्या दि. 10 रोजी जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास शेतकर्‍यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे. यावेळी प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख, मुकुंद सपकाळे,अमोल कोल्हे, सचिन धांडे, अशोक पवार, भरत बारेला, केशव वाघ, चंद्रकांत चौधरी, धर्मा बारेला, ताराचंद बारेला, प्रकाश बारेला, भारती गाला, संदीप घोरपडे, पन्नालाल मावळे, अतुल गायकवाड, महेंद्र गायकवाड, सोमनाथ माळी, इरफान तडवी, अहमद तडवी आदी उपस्थित होते.

एनएसयुआयतर्फे कर्नाटक भाजप सरकारचा निषेध

कर्नाटक राज्यातील मनगुत्ती गावांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तापित पुतळ्याला परवानगी असतानादेखील रात्रीच्या काळोखात गावकर्‍यांना बंदिस्त करून बळाचा वापर करून ग्रामपंचायतीमधील भाजप सत्ताधार्‍यांच्या मदतीने काल कर्नाटकच्या भाजप सरकारने पुतळा हट विण्याचे निंदनीय कृत्य केले. त्याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पुतळ्यासमोर कर्नाटकच्या भाजप सरकारचा व या संपूर्ण कृत्याचा जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे शहर उपाध्यक्ष श्याम तायडे ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीप पटेल, शहर सचिव योगेश देशमुख जमील शेख, जगदीश गाडे, सेवादल महानगराध्यक्ष कैलास महाजन, दादाराव मराठे,सोनू पाटील, उद्धव वाणी आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्यावतीने कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
कर्नाटक भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना जळगाव तालुका व महानगरच्यावतीने शिवसेना कार्यालयासमोर कर्नाटके मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, महानगर संघटक दिनेश जगताप ,तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा गटनेते बंटी जोशी , सभापती नंदलाल पाटील ,प. स. सदस्य जनार्धंन पाटील, माजी उपसभापती डॉ . कमलाकर पाटील, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकिर पठाण, नितीन सपके, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, पूनम राजपूत , ईश्वर राजपूत , हेमंत महाजन , प्रकाश पाटील, ओगल पान्चाळ ,प्रकाश बेदमुथा, मोहसीन शेख, इक बाल शेख, गणेश टेलर, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी , ज्योती शिवदे, चित्रा मालपाणी , गायत्री कापसे , पल्लवी इन्दाने ,रामेश्वरी जाधव यांसह जळगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Copy