सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; ‘ती’ याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

0

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. आत्महत्या प्रकरणाला दररोज नवनवीन वळण लागत आहे. मुंबई पोलीस सुशांत सिंह आत्महत्येची चौकशी करत आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.

महाराष्ट्र सरकारने देखील या प्रकरणाची तपासणी मुंबई पोलीस करत असल्याने सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असून बिहार पोलीस तपासासाठी मुंबई देखील आले मात्र बिहार पोलिसांना या प्रकरणी तपासाचे अधिकार नाही असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. भाजप नेते राम कदम यांनी राज्यातील सरकार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशी करण्यात अपयशी ठरल्याचे आरोप केले आहे.

सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांकडून बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतची मैत्रिणी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. रियाने सुशांतकडून १५ कोटी रुपये घेतले, रिया सुशांतला सतत छळायची. रियामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचे आरोप सुशांतच्या परिवाराकडून करण्यात आला आहे.

Copy