ईएलडब्ल्यू प्रशासकीय कार्यालयाला ग्रीन बिल्डिंग रेटींग

0

भुसावळ : भुसावळातील इलेक्ट्रिक लोकोमोटीव्ह कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयाला (ईएलडब्ल्यू) ग्रीन बिल्डींग रेटींग प्राप्त झाले आहे. भारतीय रेल्वेचा विद्युत विभाग (ईएलडब्ल्यू) नियमितपणे रेल्वे इंजिनाचे ओव्हरालिंग केले जाते. थ्री फेज लोकोमोटीव्हजसह सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक लोकोमोटीव्ह, इलेक्ट्रिक लोकोमोटीव्ह वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिक इंजिनची री-केबलिंग, एसी-डीसी प्रकारच्या लोकोमोटिव्हचे 6 पी-एसी इंजिनमध्ये रूपांतरण, दुरुस्ती, उत्पादन, दुरुस्ती केली जाते.

अधिकारी व कर्मचार्‍यांच्या परीश्रमाचे यश
ईएलडब्ल्यूच्या प्रशासकीय कार्यालयाला आयएसओ 9001: 2015 (गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली), आयएसओसह प्रमाणित करण्यात आले आहे. 14001 : 2015 (पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली), आयएसओ 45001 : 2018 (व्यावसायीक, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली), आयएसओ 50001: 2011 (ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली), आयएसओ 3834-2 : 2005 (मेटल मटेरीयलच्या फ्यूजन वेल्डिंगची गुणवत्ता आवश्यकता), 5 एस- कार्यस्थळ व्यवस्थापन प्रणाली, आयजीबीसी ग्रीन को गोल्ड रेटिंग प्राप्त झाले असून हे यश ईएलडब्ल्यूमधील अधिकारी/पर्यवेक्षक/कर्मचारी यांच्या मोठ्या प्रयत्नांमुळे साध्य झाले आहे.