भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्या : दोघे गंभीर जखमी

0

चितोडे गावाजवळ अपघात : अपघातानंतर यावल पोलिसांची धाव, दुचाकींचे मोठे नुकसान

यावल : भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाले.
यावल-फैजपूर रोडवरील चितोडे गावाजवळ सोमवारी सकाळी नऊ वाजता इहा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी धाव घेतली. यावल-फैजपूर रोडवरील चितोडे गावाजवळ पिरोबा देवस्थानाजवळ उतारावर सुसाट वेगाने येणार्‍या दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक झाल्याने यावलकडून सांगवीकडे जाणारे प्रा.धांडे आणि सावदा येथून यावलकडे दुचाकीवरून येणारा एक बांधकाम करणारा मिस्तरी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मिस्तरी यांचा एक पाय फ्रॅक्चर झाल्याने यावल पोलिसांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर प्रा. धांडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना चितोड़े ग्रामस्थांनी तातडीने भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Copy