VIDEO: जळगावात लॉकडाऊननिमित्त चोख बंदोबस्त: अनावश्यक फिरणाऱ्यांना दंडुका !

0

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने आज ७ जुलैपासून १३ जुलैपर्यंत जळगाव शहरासह अमळनेर, भुसावळ शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याकाळात आवश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळपासून जळगाव शहरातील विविध चौकात पोलिसांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. अनावश्यक फिरणार्यांना पोलीस दणका देखील देत आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून लॉकडाऊनचे पालन होत आहे की नाही याची माहिती घेतली.

शहरातील डीएसपी चौक, कोर्ट चौक, टॉवर चौक, सुभाष चौक, प्रभात चौकात पोलिसांचे पथक सकाळपासून दाखल झालेले असून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात असून ओळखपत्र दाखवल्याशिवाय पुढे जाऊ दिले जात नाहीये. अनावश्यक बाहेर पडू नका असे आवाहन देखील पोलीस करतांना दिसत आहेत.