बापरे बाप…जिल्ह्यात नवीन 254 कोरोना पॉझिटिव्ह !

0

सलग तिसर्‍या दिवशी 5 पेक्षा जास्त बाधीतांचा मृत्यू

जळगाव– जिल्ह्यात तब्बल 254 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4 हजार 430 झाली आहे. रविवारी सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरात 64 रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

आज नव्याने 254 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 64, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 8, अमळनेर 15, चोपडा 23, पाचोरा 4, धरणगाव 6, यावल 25, एरंडोल 13, जामनेर 2, रावेर 22, पारोळा 3, चाळीसगाव 19, मुक्ताईनगर 21 , बोदवड 24 व अन्य जिल्ह्यातील 2 याप्रमाणे रुग्णांच समावेश आहे.

कोरोनामुळे 8 रूग्णांचा मृत्यू

आज दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 3, जळगाव तालुक्यातील 2 पारोळा, जामनेर आणि एरंडोल प्रत्येकी याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.

Copy