वरणगावातील राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र परत न दिल्यास जेलभरो आंदोलन

0

भुसावळ : भाजपा शासन काळात हतनूर येथे वरणगाव पोलिस प्रशिक्षण केंद्राला 1999 मध्ये युती सरकारला मंजुरी मिळाली होती मात्र नंतर पोलिस प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता नसल्याची बाब पुढे आल्यानंतर राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 19 ला मान्यता मिळाली होती. त्यानंतर मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राजकीय आकसापोटी वरणगावचे मंजूर केंद्र जामखेड मतदारसंघात आमदार पळवण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी वरणगावात स्व.गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा लावून पूजन करून भाजपा पदाधिकार्‍यांनी निदर्शने केली. हतनूरला मंजूर राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र परत न दिल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह भाजपा नेते अल्लाउद्दीन सेठ, शामराव धनगर, सुनील माळी, गोलू राणे, नटराज चौधरी, रमेश पालवे, हितेश चौधरी, आकाश निमकर, संजय सोनार यांनी प्रसंगी दिला.

आकसापोटी पळवले प्रशिक्षण केंद्र
तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्याहस्ते व तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन झाले होते मात्र 1999 नंतर राजकीय आकसा पोटी मंजूर पोलीस प्रशिक्षण केंद्राला निधी देण्यात आली नाही व असे असताना भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 135 कोटी रुपयांचा निधी प्रशिक्षण केंद्राला 7 ऑगस्ट 2019 ला मंजूर केला होता, असेही या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.

Copy