नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा 5 जण कोरोना पॉझिटिव्ह

0

नंदुरबार: शहरासह जिल्ह्यातील अनेक कोरोना बाधित रुग्ण बरे होत असतांनाच आज 22 रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पुन्हा 5 जण कोरोना  पॉझिटिव्ह आले आहेत. आजचउपचार घेऊन बरे झालेल्या 6 व्यक्तींना डीचार्ज देण्यात आला होता, परंतु जिल्ह्यात आज आणखी नवे 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्या तळोदा येथील मोठा माळीवाडा 1, शहादा येथील गणेश नगर मधील दोन्ही पूर्वीच क्वॉरंटाईन होते नंदुरबार शहरातील कोकणी हिल मधील 1 आणि सिंधी कॉलनी मधील 2 जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील आता पर्यंतची कोरोना बधितांची संख्या 83 झाली असून 47 जण बरे झाले आहेत, 5 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 29 जण उपचार घेत आहेत.