अमेरिकेने डब्लूएचओ सोबतचे सर्व संबंध तोडले

3

वॉश्गिंटन – जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातची बाहुली असल्याचा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली.

जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णत: चीनची पकड आहे. अशा परिस्थितीत अमेरिका त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडत आहे, असे ट्रम्प म्हणाले. सुरूवातीला जागतिक आरोग्य संघटना करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरली. वर्षाला केवळ ४० दशलक्ष डॉलर्सची मदत करूनही जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचं वर्चस्व आहे, त्याच्या तुलनेत अमेरिकेकडून ४५० दशलक्ष डॉलर्सची मदत केली जात होती. परंतु संघटना आवश्यक त्या सुधारणा करण्यास अपयशी ठरली. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा जो निधी थांबवण्यात आला आहे, तो जगातील अन्य आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चीनच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांचीही माहिती दिली.

Copy