पेट्रोल पंप लुटीच्या प्रयत्नातील दरोडेखोर यावल पोलिसांच्या जाळ्यात

0

यावल : पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अकलूद, ता.यावल येथील सहा दरोडेखोरांच्या यावल पोलिसांनी गुरुवारी पहाटे मुसक्या आवळल्या होत्या. गुरुवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकारी हेड कॉन्स्टेबल संजय देवरे व अन्य कर्मचारी गस्तीवर असताना यावल-भुसावळ रस्त्यावरील पाटाच्या चारी जवळील घोडेपीर बाबा दर्ग्यादरम्यान असलेल्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोड्याच्या तयारीत संशयीत असल्याचे दिसताच पोलिसांनी आरोपींवर झडप घालण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून कुर्‍हाड,. चाकू, सुरा, लाकडी दांडे, दोरी, मिरची पावडर आदी दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या आरोपींना झाली अटक
अटकेतील आरोपींमध्ये मनोज रमेश सपकाळे (20), गणेश उर्फ अजय जनार्दन सोनवणे (19), संदीप आत्माराम सपकाळे (21), शिव हरी बागडे (18) या चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य दोन संशयीत आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आरोपींविरुद्ध यावल पोलिसात गुरनं. 66/2020 भादंवि 399 सह शस्त्र अधिनियम 4/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.

Copy