20 ट्रॅक्टर भरून कचर्‍याचे संकलन

0

भुसावळ। शहरातील कचर्‍याची समस्या लक्षात घेता राजकीय पुढार्‍यांसह सामाजिक संघटनांनीदेखील पुढाकार घेवून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. येथील आपात्कालीन जीवन रक्षक दलातर्फे तीन दिवसीय स्वच्छता अभियानात शहरातील वेगवेगळ्या भागात साफसफाई करण्यात आली. याद्वारे 20 ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात येवून त्याची रेल्वे लाईनजवळील डंपींग ग्राऊंडजवळ विल्हेवाट लावली.

या भागात केेली स्वच्छता
महात्मा गांधी पुतळ्यापासून शहर पोलीस स्थानक, वसंत टॉकीज, नगरपालिका, हंबर्डीकर बेकरी, लोखंडी पुल, शिवाजी कॉम्प्लेक्स, अग्रसेन चौक, वाल्मिक नगर, अष्टभुजा मंदिर, नवशक्ति कॉम्प्लेक्स, ब्राह्मण संघ, नृसिंह मंदिर या भागात स्वच्छता करण्यात आली.

यांनी घेतला सहभाग
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जीवन रक्षक दलाचे संस्थापक रितेश बिजलपुरे, सुनिल भोई, प्रकाश भोेई, अशोक सोनवणे, मनोज पवार, संजय भोई, अनिल पवार, लहू भिल, जंगलू पवार यांसह कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेवून मोहिम यशस्वी केली. तसेच जंतुनाशक पावडर फवारणी करण्यात आली.