यावलमध्ये बेकायदा दारूची वाहतूक : एका आरोपीला अटक

0

यावल : दुचाकीवरून बेकायदा दारूची वाहतूक करणार्‍या एकाला यावल पोलिसांनी पकडत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या ताब्यातून सात हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. अटकेतील आरोपीचे नाव डॅनी असल्याचे सांगण्यात आले. यावल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व हेड कॉन्स्टेबल युनूस तडवी, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, असलम खान, राहुल पांचाळ, राजेश महाजन चौकात बंदोबस्तावर असताना एका दुचाकीवर तोंडाला रूमाल लावून फिरणार्‍यास पोलिसांनी हटकल्यानंतर त्याच्या ताब्यातून मॅकडॉल, ओसी, एमबी कंपनीची दारू जप्त करण्यात आली. दरम्यान, शहरात बोरावल गेट, पेट्रोल पंप, सातो द रस्ता आणि कानाकोपर्‍यात उघड्यावर गावठीची विक्री होत असल्याने पोलिसांनी कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Copy