19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

भुसावळ : शहरातील चांदमारी चाळ भागातील 19 वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली. 29 रोजी सायंकाळी 7.45 वाजता ही घटना घडली. पूजा दीपक आव्हाड (19, रा.आरबीआय 725/चांदमारी चाळ, भुसावळ) असे मयत तरुणीचे नाव आहे. तरुणीने ाहत्या घरी ओढणीने छतास गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात सतीश रामराव आव्हाड यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय कंखरे करीत आहेत.

Copy