1877 साली पहिला कसोटी सामना इग्लंड व ऑस्ट्रोलियात खेळवला गेला

0

मुंबई । आधुनिक युगात क्रिकेटचे रूपही पालटले आहे. क्रिकेटमध्ये संगणक,कॅमेरे याचे ही सहकार्य घेण्यात येवू लागले आहे. पंचाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी रिव्हयूचा पर्याय आज अचूक ठरत आहे.असे असले तरी फलंदाज, गोलंदाज,क्षेत्ररक्षण किंवा संपुर्ण संघाची कसोटी पाहावयाची असेल तर कसोटी क्रिकेट खुप महत्वाचे आहे.याच कसोटी क्रिकेटला 15 मार्च रोजी 140 वर्षाचे झाले आहे. 15 मार्च 1877 रोजी पहिला कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये झाला होता.जरी क्रिकेट खेळण्यात बदल झाले असले तरी कसोटी क्रिकेटची वेगळेच महत्वाचे आहे.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 45 धावांनी मात केली होती
ट्वेन्टी-20 क्रिकेटचा जमाना असला तरी क्रिकेटपटूच्या कौशल्याची कसोटी पाहणा़र्‍या कसोटी क्रिकेटने आपली महत्त्व जपले आहे. धकाधकीच्या जीवनात झटपट क्रिकेटचा आनंद लुटण्याकडे चाहत्यांचा ओढा असला तरी खेळाडूची पारख होण्यासाठी कसोटी क्रिकेट खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता अजूनही कायम आहे. अशा या कसोटी क्रिकेटचा आज 140 वा वाढदिवस आहे . ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर 15 मार्च 1877 साली पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला होता. या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये पाच दिवस चाललेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 45 धावांनी मात केली होती.

भारताने 510 कसोटी खेळल्या
दुस़र्‍या कसोटीत इंग्लंडने पुनरागमन करत 1-1 अशी बरोबरी साधली होती. क्रिकेटच्या इतिहासात 1877 साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला असला तरी भारताने मात्र 1932 साली कसोटी खेळायला सुरूवात केली होती. भारतीय संघाने आजवर 510 कसोटी सामने खेळले आहेत. यात 138 सामन्यांत विजय, तर 158 सामने गमावले आहेत. तब्बल 213 सामने अनिर्णीत राहिले आहेत. सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडच्या संघाने आजवर 983 कसोटी सामने खेळले आहेत. यात 351 सामन्यांत विजय, तर 289 सामन्यांत पराभव झाला आहे.

गुगल सर्च इंजिनने नोंद घेतली
बांगलादेशच्या संघाने सर्वात कमी कसोटी सामने खेळले आहेत. बांगलादेशच्या संघाने आजवर फक्त 99 कसोटी सामने खेळले असून यातील केवळ 8 कसोटी सामने त्यांना जिंकता आले आहेत. माहितीच्या महाजालात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘गुगल’ या सर्च इंजिनने या दिवसाची नोंद घेऊन कसोटी क्रिकेटचा 140 वा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले आणि त्यासाठी खास डुडल तयार करण्यात आले आहे. डुडलमध्ये एक क्रिकेटचा संघ दाखविण्यात आला असून खेळाडूंच्या जर्सीवर गुगलची इंग्रजी अद्याक्षरे लिहीली आहेत.