आयपीएल: थोड्याच वेळात कोलकाता आणि दिल्ली भिडणार !

0

कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज इडन गार्डनवर आयपीएल सामना रंगणार आहे. कोलकाताने सहा सामन्यात 4 विजय मिळवते आहेत, तर दिल्लीलला 3 विजय मिळवता आले आहेत. मात्र, दिल्लीने घरच्या मैदानावर कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाता सज्ज झाला आहे.

कोलकाताची संपूर्ण मदार ही आंद्रे रसेलवर आहे. त्याला अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळत नाही. ख्रिस लीन, सुनील नरीन, रॉबीन उथप्पा आणि नितीश राणा यांना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. शुबमन गिलला सहाव्या स्थानावर खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरत आहे. त्यामुळे त्याला बढती दिली जाऊ शकते. पियुष चावला, कुलपीद यादव आणि नरीन यांच्यावर गोलंदाजीची मदार आहे.

दुसरीकडे दिल्लीचा संघही विजयपथावर परतला आहे. दिल्लीची संपूर्ण मदार ही त्यांच्या गोलंदाजांवर आहे. कागिसो रबाडा, अक्षर पटेल आणि संदीप लामिचाने हे त्यांचे प्रमुख अस्त्र आहेत. फलंदाजीत शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी निराश केले आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि कॉलिन इंग्राम यांनी योगदान दिले आहे.

Copy