17 वर्षीय बालकाची हंबर्डीत आत्महत्या

फैजपूर : तालुक्यातील हंबर्डी येथील 17 वर्षीय बालकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उदय हेमंत पाटील (17) असे मयत बालकाचे नाव आहे. राहत्या घरात छताच्या हुकाला दोरी बांधुन गळफास उदय पाटील या बालकाने आत्महत्या केली. मयत हा गावातील शेतकरी हेमंत सुधाकर पाटील यांच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. बालकाच्या आत्महत्येने गावात शोककळा पसरली. मयताचे मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी केले. याबाबत यांनी केले. फैजपूर पोलिस स्टेशनला प्रशांत चंद्रकांत पाटील यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. मयताचे आत्महत्या का केली? याचे ठोस कारण कळू शकले नाही.