Private Advt

17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची गळफास घेत आत्महत्या

जामनेर : तालुक्यातील शेंदुर्णी गावातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. भाग्यश्री दिलीप जावळे (17, शेंदुर्णी, ता.जामनेर) असे मयत तरुणीचे नाव आहे. मंगळवार, 3 रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
भाग्यश्री ही तरुणी अकरावीच्या वर्गातून उत्तीर्ण झाली होती. मंगळवार, 3 मे रोजी रात्री तिने राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच कुटुंबियांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असताना बुधवार, 4 मे रोजी दुपारी तिची प्राणज्योत मालवली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून या घटनमुळे कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला. मृत भाग्यश्रीच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परीवार आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.