Private Advt

15 हजारांच्या सागवान लाकडाची चोरी

यावल : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बोराडे शिवारातील सागवान झाड कुणीतरी अज्ञात चोरट्याने मध्यरात्री कापुन लाकूड चोरुन नेल्याचा प्रकार रविवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. बोराडे शिवारातील गट नंबर 43 येथे शुभांगी शरद पाटील यांच्या मालकीचे शेत आहे. त्यांच्या शेतात 25 मीटर उंचीचे सागवान झाड आहे. 25 डिसेंबर रोजी रात्री 8 ते रविवार. 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शुभांगी पाटील यांच्या शेतातील सागवान झाड कापून लाकूड चोरुन नेले. या संदर्भात शेतमालक शुभांगी पाटील यांनी वन विभागाकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार यावल वनविभागाचे वनपाल हरीपुरा यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता 15 हजार रुपये किमतीचे सागवान झाड बुंध्यापासून कापून नेल्याचे दिसून आल. पंढरी अडकमोल, विनोद पाटील यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.