Private Advt

15 लाख रुपये न आणल्याने भुसावळातील विवाहितेचा छळ

भुसावळ : माहेरहून 15 लाख रुपये आणल्याशिवाय घरी यायचे नाही, अशी धमकी देणार्‍या पतीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीविरोधात गुन्हा दाखल
रत्नमाला कृष्णा बावस्कर (41, लक्ष्मीनगर, जामनेर रोड, भुसावळ) यांचा विवाह कृष्णा घनश्याम बावस्करी यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे काही वर्ष चांगले गेल्यानंतर विवाहितेने माहेरहून 15 लाख रुपये आणावेत म्हणून पतीने मारहाण करण्यास सुरूवात केली तसेच तू जर माहेरहून 15 लाख रुपये आणले नाही तर घरी यायचे नाही, अशी धमकी देण्यात आली. याबाबत विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दिल्याने कृष्णा बावस्कर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.