12 हजारांवर विद्यार्थ्यांनी दिली सीईटी परीक्षा

0

जळगाव। राज्यशासनातर्फे घेण्यात येणार्‍या एमएचटी-सीईटी-2017 परीक्षा आज झाली. जिल्ह्यातील 37 उपकेंद्रांत सुमारे 12 हजार 192 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. सदर परीक्षा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत झाली. जिल्ह्याचा पारा अधिक असल्याने पेपर लिहतांना विद्यार्थ्यांचा चांगलाच घाम निघाला.

यावेळी फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर थोडा कठीण तर बायोलॉजीचा पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान शहरातील काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पाणी जवळ ठेवू न दिल्याने हाल सहन करावे लागले. उन्हाळ्याचे दिवस असतांनाही इतका वेळ पाणी न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शरीराची लाहीलाही झाली होती. शहरातील मू. जे महाविद्यालय, बेंडाळे महाविद्यालय, ला.ना हायस्कूल यांसह इतर केंद्रांवर शांततेत परीक्षा झाली.