12 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

0

जमिनीच्या वादातून दहा जणांना मारहाण

चाकण : जमिनीच्या वादातून दोन गटात मारहाण झाली. यामध्ये 12 जणांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) कुरकुंडे गावच्या हद्दीत सकाळी दहाच्या सुमारास घडली. अरुण दामू वाघमारे (वय 63, रा. कुरकुंडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वंदना उत्तम पडवळ (वय 40), उर्मिला बाळासाहेब पडवळ (वय 35), सविता अशोक पडवळ (वय 35), सोनाबाई बाजीराव पडवळ (वय 70), हिराबाई कुंडलिक पडवळ (वय 45), नंदाबाई गुलाब पडवळ (वय 50), अलका तुकाराम पडवळ (वय 50), उत्तम बाजीराव पडवळ (वय 50), बाळासाहेब बाजीराव पडवळ (वय 40), गुलाब तुकाराम पडवळ (वय 30), अरुण हरिचंद्र पडवळ (वय 30), किरण तुकाराम पडवळ (वय 45, सर्व रा. कुरकुंडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण यांची पत्नी शोभा वाघमारे, मुलगा किरण वाघमारे, पुतण्या विशाल वाघमारे, सागर वाघमारे, भाऊ दीपक वाघमारे, प्रकाश वाघमारे, पुतणी पूजा वाघमारे, भावजय सुजाता वाघमारे, छाया वाघमारे हे सर्वजण शनिवारी सकाळी शेतातील कामासाठी शेतात गेले होते.

फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये जमिनीच्या कारणावरून भांडण झाले होते. त्यातूनच आरोपींनी फिर्यादी यांच्या शेतात जाऊन सर्वांना धमकी देत मारहाण केली. तसेच जातीवाचक अपशब्द वापरले. यावरून आरोपींविरोधात मारहाण आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार तपास करीत आहेत.

Copy