तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव । मेहरूण परिसरातील रेणुकानगरातील युवकाने बुधवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मजुरी काम करणारा रुपेश रघुनाथ गोंधळी (वय 24) हा त्याची आई सुमनबाई गोंधळी यांच्या सोबत रेणूकानगरात पार्टेशनच्या घरात भाड्याने राहत होता.

बुधवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास सुमनबाई या घराबाहेर कपडे धुवत होत्या. कपडे धुवून झाल्यावर त्या घरात गेल्या. त्यावेळी वरच्या मजल्यावरील खोलीत रुपेशने ओढणीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडा ओरड केली. त्यामुळे आजुबाजुला राहाणारे त्या ठिकाणी आले. त्यांनी रुपेशला खाली उतरवून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे आपतकालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र रुपेशच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.