10 हजार रुपये किंमतीची सावदा शहरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली

The thieves stole the bike from Sawada City सावदा : शहरातील हॉटेल चंद्रमा शेजारील देशी दारू दुकानासमोरील मोकळ्या जागेतून 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. ही घटना मंगळवार, 20 रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी
संजय वामन नेहेते (49, ओम कॉलनी, सावदा) यांची दुचाकी (एम.एच. 19 ए.एन.2919) ही हॉटेल चंद्रमाजवळ उभी असल्याची संधी चोरट्यांनी साधली. तपास एएसआय महेमूद शहा कादर शहा करीत आहेत. दरम्यान, वाहनांच्या वाढत्या चोर्‍यांमुळे खळबळ उडाली असून गावातील सीसीटीव्ही फुटेज आधारे चोरट्यांचा शोध घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.