1 जूननंतर होणार झोपडपट्टीत तांदूळ वाटप; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

0

पुणे:- शिधापत्रिका नसलेल्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देतांना झोपडपट्टी भागात 1 जून नंतर घरपोच धान्य पुरवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची झोपडपट्टी भागात अंमलबजावणी करतांना विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिक धारकांना मे आणि जून या दोन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच झोपडपट्टी भागात हे धान्य स्वयंसेवकां मार्फत घरपोच देण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विनाशिधापत्रिका धारकांना ऑनलाइन पद्धतीने धान्य वितरण केले जाणार आहे. संबंधित लाभार्थ्यांना त्यांचे आधारकार्ड क्रमांक किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र सादर करणे आवस5 असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे, पिंपरी चिंचवड या शहरासाठी 113 अन्नधान्य वितरण केंद्रे निश्चित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Copy