९० वर्षाची परंपरा असलेल्या संघाच्या कार्यक्रमाला कोरोनामुळे स्थगिती

0

जळगाव: जगभरात दहशत निर्माण करणारा ‘करोना विषाणू संसर्ग’ आजाराचा समाजास व नागरिकांना असलेल्या संभाव्य धोक्यामुळे जागतिक स्तरावर व देशात अनेक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून दरवर्षी होणारा सघोष पथ संचलन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ९० वर्षात पहिल्यांदाच हा कार्यक्रम रद्द होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंमसेवकांनी सामाजिक क्षेत्रात जागरूकता आणण्यासाठी आणि आव्हानाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शहर संघचालक डॉ विलास भोळे यांनी केले आहे.

Copy