Private Advt

७०० लीटर डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड

पोलीलांची मोठी कारवाई, ७ जण अटकेत

 

 

जळगाव –

एसआय इंडस्ट्रीज कंपनीतून ६५ हजार ८०० रुपयांचे ७०० लिटर डिझेल २७ डिसेंबर रोजी रात्री चोरीस गेले होते. कंपनीचे कर्मचारी सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अखेर ‘त्या’ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, चोरीतील १४० लिटर डिझेलही पोलिसांनी जप्त केले आहे.

 

ही चोरी कंडारी येथील तरुणांनी केल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार पाेलिसांच्या पथकाने रविवारी रात्री कंडारी येथे जाऊन चाैकशी केली. गावातून हर्षल बाविस्कर, सुनील रमेश सोनवणे, तरबेज इब्राहिम पिंजारी, अंकित अनिल निकम, वैभव विनोद चिंचोल, रणजीत किरण परदेशी आणि राम शंकर सूर्यवंशी (सर्व रा. कंडारी, ता. जळगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक फोसदार अतुल वंजारी, गुफर तडवी, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, एम्र्य सय्यद, सचिन पाटील, शिदेश्वर डावकर व साईनाथ मुंडे या पथकांनी ही चौकशी केली.