५१ हजाराची अवैध वनसंपदा केली जप्त

0

नवापूर : खैर जातीच्या वृक्षांची तोड करून विकण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या जागी कारवाई करत नंदुरबार वनविभागाने ५१ हजाराचा माल जप्त केला. याप्रकरणी चिंतामण कोकणी याला ताब्यात घेण्यात आले असून जप्त केलेला माल जमा करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नवापूर यांना मिळलेल्या गुप्त बातमी वरून मौजे भवरे ता. नवापूर येथील आरोपी चिंतामण कोकणी यांच्या शेतात धाड टाकली. घरांपुढे शेतात भाताच्या चाऱ्याखाली लपवून ठेवलेल्या खैर जातीचे लाकूड लपविले असल्याची खबर मिळाली होती.

वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी भवरे गावात जावून तपासणी केली असता गवताखाली लपवून ठेवलेले ताज्या तोडीचे बिना पासीचे व शिक्याचे अवैध खैर जातीचे नग सापडले. साल काढलेला खैर नग 82 घन मीटर 1.80.2 किंमत 51 हजारचा माल यावेळी सापडला. सदरचा माल जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा केला आहे. सदर प्रकरणात वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या कार्यवाहीत वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल पी.बी.मावची, विक्री आगार वनपाल ए.एन.जाधव, डी.के वारूळे, कृष्णा वळवी, एस. पी. पदमोर, एस. बी. गायकवाड, आरती नगराळे, मेघा बोरसे, विद्या ठाकरे, पी. डी. पाटील, ज्योतीबा कांदे, छगन सोनवणे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या धडक कारवाईमुळे लाकुड तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आर. एफ. ओ यांनी पदभार सांभाळल्याबरोबर लागोपाठ कारवाई सञ सुरु केल्याने तस्करांवर वाचक बसला आहे.