४ वर्षानंतर रितेश-जेनेलिया करणार स्क्रिन शेअर

0

मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटातही आपली छबी उमटवणाऱ्या रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रेम मिळाला होता. आता रितेश ‘माऊली’ या मराठी चित्रपटातून परत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटातील होळीच धमाल गाणं ‘धुवून टाक’ हे प्रदर्शित झालं आहे.

‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून फेम मिळालेली जेनेलिया डिसुझा ही रितेशची पत्नी असून त्याची को-स्टार ही होती. आता हे दोघेही ४ वर्षानंतर स्क्रिन शेअर करणार आहे. रितेशने खास कॅप्शन देत हे गाणे त्याच्या ट्विटरवर शेअर केले आहे. ‘लय भारी’ चित्रपटातही होळीच्या रंगोत्सवरात रितेशचे ‘लय भारी’ गाणे सादर करण्यात आले होते. हे गाणे प्रेक्षकांमध्ये भरपूर हिट झाले होते.

काही दिवसांपूर्वीच माऊली चित्रपटाची पहिली झलक म्हणजेच टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Copy