‘२.०’च्या सेटवर अक्षय आणि राजनीकांत बोलायचे मराठीत!

0

मुंबई : दक्षिणेतले सुपरस्टार रजनीकांत यांचे कोट्यवधी चाहते आहेत. काही फॅन्स राजनीकांतला देवाच्या स्थानी मानतात. मात्र राजनीकांत हे अतिशय साधे, निर्मळ स्वभावाचे आहेत. जो कोणी त्यांना भेटतो तो त्यांच्या या रुपाच्या प्रेमात पडतो. सुपरस्टार असूनही साधं वागणं हे अनेकांना भावते. ‘२.०’ या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत काम केलेल्या बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी प्रमोशनदरम्यान सांगितल्या.

रजनीकांत हे महाराष्ट्रीयन आहेत त्यामुळे सेटवर जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा मराठीतूनच बोलायचो. मी मुंबईत राहिल्यानं मला मराठी येते आमच्या गप्पा या बऱ्याचदा मराठीतून व्हायच्या असं म्हणत अक्षयनं रजनीकांत यांच्या बद्दल अनेक गोष्टी सांगायला सुरूवात केल्या. ते खूप नम्र स्वभावाचे आहेत. ते जसे आहेत तसेच आहेत. कधीही ते दिखावा करण्याचा प्रयत्न करत नाही, असं अक्षय म्हणाला.