‘२.०’ची पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई

0

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा बिगबजेट चित्रपट २.० प्रदर्शित झाला आहे. २०१० साली आलेल्या रजनीकांतच्या रोबोट या चित्रपटाचा ‘२.०’ हा सिक्वल आहे. रिलीझ होण्याच्या आधीच हा चित्रपट तगडी स्टारकास्ट मुळे भयंकर चर्चेत राहिला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा धमाकेदार गल्ला जमावला आहे.

या चित्रपटाचे बजेट ६०० कोटीं इतके आहे. मात्र, चित्रपटाची क्रेझ पाहता चित्रपट लवकरच ६०० कोटींचा आकडादेखील पार करेल, असे दिसत आहे. आता हा चित्रपट एकूण किती कोटींची कमाई करणार हे पाहणे मजेशीर असणार आहे.

Copy