२६/११चा मास्टरमाइंड राणाला अमेरिकेत अटक

0

मुंबई: २६/११ चा मास्टर मेंट दहशतवादी तहब्बूर हुसैन राणाला अमेरिकेतील लॉस एंजलिस मधून अटक करण्यात आली आहे. तहब्बूर राणाला अमेरिकेने या पूर्वीही अटक करण्यात आली होती. शिक्षा भोगून आलेल्या राणाला पुन्हा एकदा अटक करण्यात आली.

राणाचे भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राणाचे प्रत्यार्पण करण्यासाठी भारत भारताला पूर्ण सहकार्य करण्यात येईल येईल असे अमेरिकन प्रशासनाने सांगितले. राणाच्या प्रत्यार्पणासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याची तयारी करण्यात आली आहे.

पाकिस्तानी- कॅनडियन वंशाच्या तहब्बूर राणाला अमेरिकेत १४ वर्षाची त्या सुनावण्यात आली होती. २०२१ मध्ये त्याची सुटका होणार होती. त्यापूर्वीच त्याला सोडण्यात आले. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी त्याला २००९ मध्ये अटक करण्यात आली होती.

Copy