२४ तासात पाचशेपेक्षा अधिक महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची लागण

0

मुंबई: सध्या कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. दररोज ९० हजाराच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासात २० हजारापेक्षा अधिक नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात कोरोना योध्यांची भूमिका निभावणाऱ्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १७ हजार ९७२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी २४ तासात महाराष्ट्र तब्बल ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील तीन पोलिसांचा मृत्यू झाला.

१७ हजार ९७२ पैकी सध्या ३ हजार ५२३ पोलिसांवर उपचार सुरु आहे. १४ हजार २६९ पोलीस बांधव यातून बरे होऊन घरी गेले आहेत. एकट्या महाराष्ट्रात आतापर्यंत १८० पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Copy