२२-२३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार: शरद पवार

0

नागपूर: महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन २० दिवस झाले आहे. मात्र अद्यापही या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाही. ६ मंत्र्यांनाच सर्व खाते वाटप करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने सरकारवर आरोप देखील होत आहे. दरम्यान येत्या २२ किंवा २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे.

थोड्याच वेळापूर्वी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची बैठक सुरु झाली आहे. बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होत आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांकडे कोणते खाते द्यावे? यावर आजच्या बैठकीत चर्चा होत आहे. बंद दाराआड ही चर्चा होत आहे.