२०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास मनपा महासभेची मान्यता

0

जळगाव: महानगरपालिकेची आज बुधवारी १२ ऑगस्टला महासभा झाली. कोरोनामुळे फिजिकल डीस्टन्सिंग म्हणून ऑनलाईन महासभा झाली. यात २०१९-२० चे सुधारित आणि २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभापती सुचिता हाडा यांनी अर्थसंकल्प मांडले. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. महासभेला महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनिल गोराणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.