२०२० चा शेवटची ‘मन की बात’; मोदींचा देशवासियांना विशेष मंत्र

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २०२० च्या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत जनता कर्फ्यू, करोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात असे म्हणत उद्योगपतींनी पुढे येण्याचं आवाहन जेके, यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांना नव्या वर्षानिमित्त संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचे सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचे कौतूक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशाने करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असे मोदी म्हणाले.