२०१९ मध्ये भाजपचा प्रचार करणार नाही-रामदेव बाबा

0

नवी दिल्ली- योगगुरु रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा आपण २०१९ मध्ये भाजपासाठी प्रचार करणार नसल्याचे सांगितले आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकांपासून आपण दूरच राहणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितलं आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना गरज असल्याने तदरच ते संकटात असल्याने आपण त्यांना खुले समर्थन दिले होते असे रामदेव बाबांनी सांगितले आहे. मात्र आता त्यांना आपली गरज नसल्याने आपण अपक्ष आणि सर्वपक्षीय आहोत असे

याआधीही रामदेव बाबा यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट करत राजकारणापासून दूर राहणार असल्याचं सांगितलं होतं. यावेळी रामदेव बाबा यांनी पंतप्रधानांवर टीका करणं लोकांचा मूळ अधिकार असल्याचं सांगितलं होतं. मात्र यावेळी पंतप्रधान देशासाठी कठोर मेहनत करत असल्याचं सांगत त्यांची बाजूही घेतली होती.

तसंच मोदी सरकारने महागाई कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं रामदेव बाबा यांनी सांगितले होते. जर त्यांनी महागाई कमी केली नाही, तर त्यांना या आगीची झळ बसेल असा इशारा त्यांनी दिला होता. २०१९ च्या आधी इंधनाचे दर कमी करा असा सल्लाही मी मोदी सरकारला दिला असल्याचं त्यांना सांगितलं होतं.

Copy