२०१४ पूर्वी देशाचा विकास झाला नाही, मोदींचे हे वक्तव्य देशासाठी अपमानकारक-राहुल गांधी

0

नवी दिल्ली-२०१४ पर्यंत देशाचा विकासच झाला नाही. देश निद्रीस्त अवस्थेत होता असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य देश घडवणाऱ्या सगळ्यांचा अपमान करणारे आहे अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. भारताचा विकास करण्यात, देशाची बांधणी करण्यात अनेकांनी हातभार लावला आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचाही समावेश होतो. मात्र २०१४ पर्यंत कोणताही विकास झाला नाही असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश घडवणाऱ्या सगळ्यांचा अपमान केला आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी ते प्रचारसभा घेत आहे. आज ते पोखरण या ठिकाणी बोलते होते.

पाच राज्यात विधानसभा निवडणुक होत आहे. काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींना तीस हजार कोटींचा फायदा करून दिला असा आरोप करत राहुल गांधींनी पंतप्रधानांकडे या कराराबाबत वारंवार उत्तर मागितले. आता पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी अनेक आरोप करताना दिसत आहेत.

दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना आम्ही रोजगार देऊ, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊ, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू अशी अनेक आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणांमधून द्यायचे. आता मात्र या सगळ्याबद्दल एक चकार शब्दही मोदी बोलत नाहीत. जिंकून येण्याआधी आणि जिंकून आल्यावर दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? त्याचा तुम्हाला इतका सहज विसर पडला का? असेही राहुल गांधी यांनी विचारले आहे.