१ जूनपासून धावणार्‍या रेल्वेच्या तिकीट बुकींगला सुरूवात

0

नवी दिल्ली – एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार आहेत. या ट्रेन कोणत्या आहेत आणि वेळापत्रक रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. या स्पेशल २०० ट्रेनचं बुकिंग आज गुरूवारपासून सकाळी दहा वाजेपासून सुरु झाली आहे. यामधील ५० ट्रेन मुंबईहून सुटणार्‍या आणि मुंबईकडे येणार्‍या असणार आहेत. रेल्वेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या ट्रेनमध्ये आरएसी आणि वेटिंग तिकिटे दिली जातील मात्र वेटिंग तिकटवाल्यांना ट्रेनमध्ये जाणाच्या परवानगी नाही.

या स्पशेल २०० ट्रेनने प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना रेल्वे निघण्यापूर्वी ९० मिनिटं आधी येणे बंधनकारक आहे. त्याशिवाय सर्व प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. या गाड्या या श्रमिक ट्रेन्स व्यतिरिक्त आहेत. श्रमिक ट्रेन मोठ्या प्रमाणावर धावणार आहेत. यासाठी अनेक नवे नियम करण्यात आले आहेत.रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. ही दुकाने उघडण्यासाठी कार्यवाही सुरू करा असे आदेश रेल्वे विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पण हे करताना काही काळजी घेण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

Copy