Private Advt

१४ दिवस नोकरी करा आणि मिळावा ९ लाख रुपये पगार

नवी दिल्ली –   देशाची सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. देशातील मोठ्या प्रमाणावर तरुण हे बेरोजगार आहेत. यातच एक नवीन नोकरीची संधी लोकांपुढे चालून आलेली आहे. ती म्हणजे फक्त 14 दिवसांची नोकरी करून तब्बल 9 लाख पगार मिळणार आहे.

जाहिरातीनुसार, 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीसाठी ही नोकरी असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एका श्रीमंत कुटुंबाने ही नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. नॅनी या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये मुलांना सांभाळण्यासाठी एका नॅनीची गरज असल्याचं कुटुंबीयांनी जाहीर केलं आहे. पाच वर्षांची दोन जुळी मुलं असून त्यांची काळजी घ्यायची आहे. दररोज 59 हजार रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे यानुसार 14 दिवसांचा भारतीय चलनाप्रमाणे तब्बल 9 लाख रुपये पगार मिळणार आहे.

ख्रिसमस असल्यामुळे नॅनी मिळणं सध्या कठीण झालं आहे. त्यामुळेच ही भल्यामोठ्या पगाराची ऑफर देण्यात आली आहे. नोकरी करणाऱ्या नॅनीला त्यांचा 14 दिवस पूर्ण सांभाळ करावा लागणार आहे. या काळात तिला घरी जाता येणार नाही. ख्रिसमसच्या दिवशीदेखील तिला नोकरीवरच थांबावं लागेल आणि मुलांकडे लक्ष द्यावं लागेल. मुलांना अंघोळ घालणे त्यांना खाऊपिऊ घालणे, त्यांच्यासोबत खेळणे, झोपवणं अशी कामं नॅनीला करावी लागणार आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला मुलाला सांभाळण्याचा पाच वर्षांचा अनुभव हवा. यासोबतच त्याचे लसीकरण देखील झालेलं असणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.