१२ लाख कामगारांना दोन टप्प्यांत मिळणार प्रत्येकी पाच हजार रुपये

0

मुंबई: लॉकडाऊनमुळे रोजगार गमवावा लागणार्‍या नोंदणीकृत कामगारांना दोन टप्प्यात पाच हजार रुपये देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील नोंदणीकृत कामगारांची संख्या १२ लाख ३८ हजार इतकी आहे.
राज्यातील कामगारांचे प्रश्न सोडवून, त्यांना अपेक्षित लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने सुकाणू समिती स्थापन केली आहे. मात्र, समितीचा अद्याप अभ्यास पूर्ण झाला नसल्याने अहवाल अजूनही प्रलंबित आहे. या अहवालाची प्रतीक्षा न करता, राज्यातील नोंदणीकृत कामगारांना दोन टप्प्यात पाच हजारांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असून, मंजुरीनंतर अडीच हजारांचा पहिला टप्पा कामगारांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटींचे गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधून अजून महाराष्ट्र सरकारला निधी प्राप्त झालेला नसला तरी, राज्याच्या कल्याण महामंडाळाकडे विविध उपकराच्या माध्यमातून जमा झालेले ३१ हजार कोटी रुपये आहे. या निधीच्या सहाय्याने राज्यातील नोंदणीकृत कामगारांना दोन टप्प्यात पाच हजार रुपये देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.