१२ तासांत १२१ नवे बाधित; राज्यातील आकडा २४५५वर

0

मुंबई: राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होताना दिसत नाहीत. गेल्या १२ तासांत राज्यात १२१ करोना बाधित आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या २४५५वर गेली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील करोना रुग्णांची गेल्या १२ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात १२ तासांत १२१ करोना बाधित आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे ९२ करोना रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईच्या आसपासच्या परिसरातील नवी मुंबईत १३, ठाण्यात १०, वसई-विरारमध्ये ५ आणि रायगडमध्ये एक रुग्ण आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १२ तासांत आढळलेले सर्व रुग्ण हे मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातील आहेत. १२ तासांत मुंबई आणि आसपासचा परिसर वगळता इतर ठिकाणच्या रुग्णांची नोंद झाली नाही.

Copy